दापोली (प्रतिनिधी) : शेअर मार्केटमध्ये जादा परतावा मिळवून देतो असे आमिष दाखवून 72 वर्षीय सेवानिवृत्त वृद्धाची सुमारे 18 लाख 37 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील गव्हे येथील एका 72 वर्षीय सेवानिवृत्त वृद्धाला 10 डिसेम्बर 25 ते 27 फेब्रुवारी 26 या कालावधीत मयंक सिंग या व्यक्तीने इमेल व टेलिग्राम च्या साहाय्याने संपर्क साधून शेअर मार्केटचे ज्ञान घेऊन मोठा फायदा होऊ शकतो असे सांगून proxtrend या साईटच्या माध्यमातून डॉलर मध्ये ट्रेडिंग करण्यास सांगून तसेच फायदा मिळविण्यासाठी अधिक गुंतवणूक करण्यास सांगून त्यांना वेळोवेळी ऑनलाईन पैसे जमा करण्यास सांगून तेपैसे भरून घेऊन त्यांची 18 लाख 37 हजार रुपयांची फसवणूक केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदार यांनी दापोली पोलीस ठाण्यात मयंक सिंग यांचेविरोधात तक्रार दाखल केली असून दापोली पोलिसांनी मयंक सिंग याचेविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 318(2) व माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम 66(डी ) नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर करत आहेत.










