सकल हिंदू समाज मालवण यांच्या वतीने 5 एप्रिल रोजी आयोजन
मालवण | प्रतिनिधी : मालवण दशक्राेशी मधील हिंदू समाजामध्ये स्वत्वाची जाणीव होऊन हिंदू समाजामध्ये ऐक्याची भावना कायम रहावी यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवार ५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता हिंदू संमेलनाचे आयोजन आर. जी. चव्हाण मंगल कार्यालय वायरी येथे करण्यात आलेले आहे.
सदर कार्यक्रमांमध्ये प्रमुख व्याख्यात्यांच्या स्फूर्तीदायक व्याख्यानाबरोबरच मालवण मधील तरुण कलासंपन्न व्यक्तींच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या संमेलनाला विराट स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी आणि हिंदू समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी या संमेलनाला मालवण दशक्राेशीमधील हिंदू नागरिकांनी आपल्या कुटुंब आणि मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन सकल हिंदू संमेलन समितीचे संयोजक ॲड श्री. पलाश लीलाधर चव्हाण, सहसंयोजक अविनाश काेळंबकर, साै. शिल्पा गाड, कोषाध्यक्ष विनायक न्हिवेकर यांनी केले आहे.











