देवगड / प्रतिनिधी
देवगड तालुक्यात गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व गारपीट झाली सकाळपासून जाणवणाऱ्या प्रचंड उष्म्यानंतर सायंकाळी झालेल्या गडगडाटासह पाऊस पडला काही ठिकाणी गारा पडल्याचे वृत्त आहे
गुरुवारी सकाळपासूनच तालुक्यात उन्हाचा कडाका आणि आर्द्रता वाढल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. मात्र सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला. तालुक्यातील नारिंग्रे, मिठबांव, कातवण, तळेबाजार आणि शिरगांव परिसरात गारा व पाऊस बरसला
विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली.












