आपल्या कुटुंबाचा विनाश थांबवा….. स्लो पॉईझन शरीरात प्रवेश करते आहे डॉ प्रशांत परांजपे यांनी केले कळकळीचे आवाहन

रत्नागिरी :
आम्ही आजपर्यंत वारंवार…. वेळोवेळी सांगत आलो आहोत….. सिंगल युज प्लास्टीक चा वापर बंद करणे अत्यावश्यक आहे .मानवी आणि पर्यावरणीय आरोग्याला ते घातक आहे . मात्र आता तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल कारण मानवाच्या शरीरात आणि रक्तातही मायक्रोप्रॅस्टिकने थेट प्रवेश केला आहे
वेगवेगळ्या माध्यमातून माणसाच्या पोटात आठवड्याला पाच ग्रॅम म्हणजेच एका क्रेडिट कार्डच्या वजनाएवढे प्लास्टीक जात आहे. महिन्याला २१ ग्रॅम आणि वर्षाला २५० ग्रॅम मायक्रो प्लास्टीक मानवी शरीरात प्रवेश करू लागले आहे
त्यामुळे सिंगल युज प्लास्टीक किंबहुना सिंगल युज वापराच्या सर्वच वस्तूंचा वापर त्वरित बंद करणे आवश्यक झाले आहे.
तुम्ही आजपर्यंत दुर्लक्षित करीत आलात ; पण आता नजरेआड करू नका; हे खरे आहे की मानवी शरीरामध्ये मायक्रो प्लास्टीक नी थेट प्रवेश केला आहे.
यामुळे वाढणारे विविध आजार ही माणसाच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. ऑस्ट्रेलियातील न्यू कास्टल विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या संशोधन अहवालातून हा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे.
प्लास्टीकमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा धोका आता पर्यावरणापुरताच मर्यादित राहिलेला नसून, तो थेट मानवी शरीरात पोहोचत असल्याचे वास्तव आहे. पाणी, अन्नघटक व हवेतून प्लास्टीकच्या सूक्ष्म कणांचा शरीरात शिरकाव वाढला असून, रक्त, फुफ्फुस व गर्भाशयापर्यंत हा धोका पोहोचल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

संशोधन काय सांगते?

८० टक्क्यांहून अधिक लोकांच्या शरीरात सूक्ष्म प्लास्टिक कण

👉बाटली बंद पाण्यात प्लास्टिक कणांचे प्रमाण दहापट जास्त👈

हवा, पाणी आणि अन्नसाखळीमधून मायक्रोप्लास्टिकचा शिरकाव

रक्त, फुफ्फुस आणि प्लेसेंटा (गर्भातील भाग) पर्यंत धोका

कॅन्सरच्या शक्यता वाढीचे प्रमुख कारण

प्लास्टीक कण शरीरात साठून दीर्घकालीन आजारांसाठी कारणीभूत

या बाबतची करणे जाणून घ्या

सिंगल यूज प्लास्टीकचा वाढता वापर

प्लास्टिक कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन

सिंथेटिक कपडे, कॉन्टॅक्ट लेन्स, वाहनांचे टायर यातून निघणारे सूक्ष्म कण

प्रदूषित हवेच्या सान्निध्यातील वाढता वावर.

बाटली बंद पाणी पिण्याची सवय.

मायक्रोप्लास्टिक म्हणजे काय*?
हवा, पाणी आणि अन्नसाखळीतील पाच मि.मी.पेक्षा लहान प्लास्टिकचे कण, ज्यांची सूक्ष्मता डोळ्यांना न दिसण्याइतकी असते. जे फक्त मायक्रोस्कोप खालीच घेतल्यानंतर दिसून येतात.