खेड (प्रतिनिधी) : मुंबईतील इस्लाम जिमखाना, मरीन लाईन येथे खेड तालुक्यातील उधळे गावचे सुपुत्र व दुबईस्थित प्रतिष्ठित उद्योजक सन्मा श्री. बशीरभाई हजवानी यांचे सुपुत्र मोहम्मद आणि श्री. शमीम दुलदुले यांची कन्या झैनब यांच्या शुभविवाहानिमित्त भव्य स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या समारंभास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी नगराध्यक्ष अॅड. श्री. वैभवजी खेडेकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तथा गटनेते श्री. रहीमभाई सहिबोले, खेडमधील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक तसेच मुकादम डेव्हलपर्सचे मालक व हाजी एस. एम. मुकादम हायस्कूलचे अध्यक्ष श्री. शमशुद्दीनभाई मुकादम, मुकादम डेव्हलपर्सचे मालक श्री. वाहिद उर्फ परवेजभाई मुकादम, डॉ. श्री. रियाज मुल्ला तसेच खेड शहर अध्यक्ष श्री. नईम चौगुले आदी मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभेच्छा दिल्या.
भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी २७ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या या सोहळ्यात नवदाम्पत्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मंगलमय शुभेच्छा व्यक्त केल्या.













