गुहागर प्रतिनिधी:
तालुक्यातील तळवली येथे प्रथमच ग्रामदेवता श्री सुकाई देवी चषक 2026 चे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचा शुभारंभ प्रशांत केळसकर यांच्या शुभहस्ते पार पडले.
तळवलीची ग्रामदेवता श्री सुकाई देवी ही नवसाला पावणारी म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. देवस्थानच्या माध्यमातून प्रथमच या ठिकाणी भव्य मोठी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जात असून प्रशांत केळसकर यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा पुरस्कृत केली आहे. सदर स्पर्धा ही एक ग्रामपंचायत व खुला गट अशी खेळवण्यात येणार आहे. सदर स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 20 हजार व चषक,द्वितीय पारितोषिक 15 हजार व चषक तृतीय पारितोषिक 5 हजार व चषक,चतुर्थ पारितोषिक 4 हजार व चषक असणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर व प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर यांना देखील चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. सदरची स्पर्धा श्री. सिद्धिविनायक मंदिर डावलवाडी रोड तळवली या ठिकाणी पार पडत आहे.स्पर्धेच्या शुभारंभवेळी ग्रामदेवता श्री सुकाई देवी कमिटी अध्यक्ष गणपत शिगवण, उपाध्यक्ष अशोक सांगळे,सचिव प्रदीप चव्हाण, खजिनदार अनंत कळंबाटे,सुरेश सांगळे,दिलीप आग्रे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. अमोल जड्याळ,गावकर मधुकर शिगवण,रघुनाथ शिगवण, वडद उपसरपंच संदीप धनावडे, निवारा ट्रेडर्सचे मालक भालचंद्र जोगळे आदी मान्यवर उपस्थित होते.











