घरातील लाकडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास लावून २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या

लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक चिंचवाडी येथील घटना

लांजा (प्रतिनिधी) घरातील लाकडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास लावून २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक चिंचवाडी येथे आज सोमवारी ३० मार्च रोजी सकाळी घडली आहे
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतची खबर सुरेश गणू गितये (वय ५१, रा. बेनी बुद्रुक चिंचवाडी) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली. यांचा मुलगा विश्वास सुरेश गितये (वय २२ ) याने आज सोमवार दिनांक ३० मार्च रोजी सकाळी ९.३० ते ९.४५ च्या मुदतीत घरात कोणी नसताना घरातील रूममध्ये लाकडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नासिर नावळेकर करत आहेत.