कोळंब टेंबवाडीतील पाण्याचा प्रश्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी !

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या पुढाकारातून बोअरवेलची उभारणी

पाण्याच्या समस्येतून ग्रामस्थांना दिलासा ; ग्रामस्थांनी मानले आभार

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील कोळंब गावातील टेंबवाडी येथे जलस्रोतांमधील खाऱ्या पाण्यामुळे निर्माण झालेला पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी शिवसेनेच्या माध्यमातून टेंबवाडी येथे बोअरवेलची उभारणी करून दिली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून पाण्याच्या समस्येचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

कोळंब टेंबवाडी परिसरातील उपलब्ध जलस्रोतांमध्ये मोठया क्षारयुक्त खारे पाणी झाल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक गरज असलेल्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांची समस्या लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पुढाकार घेतला. शिवसेनेच्या माध्यमातून येथे बोअरवेलची उभारणी करण्यात आल्याने पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

ग्रामस्थांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेने केलेला पुढाकार टेंबवाडीतील नागरिकांसाठी दिलासादायक ठरला आहे. बोअरवेलच्या उभारणीमुळे परिसरातील पाणीसमस्या दूर होण्यास मदत झाली असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहरप्रमुख राजू बिडये, ग्रामपंचायत सदस्य विशाल फणसेकर, स्वप्निल परब, शिवसेना युवा कार्यकर्ते शरद लोके, चैतन्य लोके, सिद्धी लोके, सुशांत भोजने, राजू हडकर, प्रसाद डीचोलकर, रेहान भोजने, आदित्य आचरेकर, गणेश पेडणेकर, अजय लोके, प्रदीप भोजने, भटा फाटक, मंगेश लोके, महेश फाटक, सचिन नरे, नामदेव नरे, पुरुषोत्तम भोजने, सुधीर पेडणेकर, बाबू धुरी, रवींद्र जेठे, सुशांत लाड, प्रथमेश लाड, विजय भोजने, भास्कर कवटकर, राणी आचरेकर, सरिता हडकर, नंदा हडकर, मंदा हडकर, दीपा फाटक, सुमन भोजने, संगीता भोजने, निकिता भोजने, उर्मिला भोजने, शिवम भोजने, शिवम फणसेकर, तन्मय नरे, मिताली फाटक, सीमा फाटक, उत्तम हडकर, रेखा पेडणेकर, सुचिता पेडणेकर, भाई ढोलम यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांच्या वतीने आमदार निलेश राणे व दत्ता सामंत यांचे मानले आभार

कोळंब टेंबवाडीतील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. पिण्यायोग्य गोडे पाणी मिळाले आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांची दखल घेऊन बोअरवेलची उभारणी करून दिल्याबद्दल शिवसेना युवा कार्यकर्ते शरद लोके यांनी ग्रामस्थांच्या वतीने आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार मानले आहेत.