मुंढर वार्ताहर:
डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान चिपळूण संचलित दुर्गाबाई हरी वैद्य माध्यमिक विद्यालय आणि भागिर्थीबाई सुदाम पाटील ज्युनिअर कॉलेज अंजनवेल तालुका गुहागर या प्रशालेचे कनिष्ठ लिपिक दशरथ तुकाराम नाटेकर यांचा नियत वयोमानानुसार सेवापुर्ती सत्कार सोहळा उस्ताही वातावरणात संपन्न झाला.
शैक्षणिक क्षेत्रातील तब्बल सव्वीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर श्री दशरथ तुकाराम नाटेकर नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहेत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे प्राचार्य श्री मंगेश
गोरिवले व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने दशरथ नाटेकर यांचा शाल पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला यानंतर विद्यालयातील विद्यार्थी रिद्धी लवंदे, ओम नाटेकर या विद्यार्थ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यालयातील शिक्षक वृंदाने देखील दशरथ नाटेकर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.
शैक्षणिक क्षेत्रात काम करत असतानाच सामाजिक धार्मिक राजकीय सांस्कृतिक या सर्व क्षेत्रात त्यांची आवड पहावयास मिळत होती. आज पर्यंत तीस होऊन अधिक नाटकांचे दिग्दर्शन ,संगीत ,नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा ,कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले. संगीत नाटकांचे परंपरा तीस वर्षाहून अधिक काळपर्यंत त्यांनी जपली. तसेच संगीत नाटकासाठी अनेक युवक कलाकारांना प्रोत्साहन देऊन ग्रामीण भागात असंख्य प्रयोग यशस्वी केले. वेलदुर नवानगर येथे श्रीराम मंदिराच्या निर्मितीत त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती नवानगर येथे भक्तांना पहावयास मिळते याचे श्रेय फक्त श्री दशरथ नाटेकर यांना जाते. गावातील मान्यवर व्यक्तींना सोबत घेऊन समाजाला आदर्श बनविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
दशरथ नाटेकर यांची शैक्षणिक कामगिरी विद्यार्थ्यांच्याही मनात कायम राहील.
सेवापूर्ती कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी लेझिम पथकाच्या साथीने शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी विद्यालयासमोरील मैदानात टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत व शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मंगेश गोरिवले यांनी सन्मानाने श्री दशरथ नाटेकर यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य मंगेश गोरीवले,शिवाजी सरगर,शावरी बंदिछोडे, उदय दामले, दिपाली कांबळे, प्रा. शलाका पाटील,प्रा. सोनाली अहिराव, प्रा. उज्वला भोबसकर,प्रा. उमेश जाधव , रवींद्र हळदे, सूर्यकांत डिके यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय दामले तर आभार दिपाली कांबळे यांनी व्यक्त केले












