‘सेवा की कहानी’ अभियानात सिंधुदुर्ग राज्यात प्रथम!

कणकवली मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या मेहनतीचे यश

प्रदेश संघटन महामंत्री सतीश धोंड यांच्या हस्ते सन्मान

सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात राबविण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत ‘सेवा की कहानी’ या उपक्रमात लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया (बाईट्स) संकलित करण्याच्या कामात सिंधुदुर्ग जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. या यशात कणकवली मंडलाचे अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घेतलेल्या विशेष परिश्रमांचा मोलाचा वाटा आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रदेश संघटन महामंत्री सतीश धोंड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध अभियानांची माहिती दिली. तसेच अभियान यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

 

‘सेवा की कहानी’ अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीत अभियानाचे सहसंयोजक तथा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण परब यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. जिल्हाभरात या उपक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी श्रीकृष्ण परब व कणकवली मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या या कामगिरीबद्दल जिल्हाभरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

 

यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, निसार शेख, मंडल उपाध्यक्ष संदीप सावंत, सरपंच सचिन पारधिये, सरपंच अजित पवार, सरपंच सुशील कदम, पपू पुजारे, सुधीर सावंत, बाबजी चव्हाण, भगवान दळवी, विजय चिंदरकर, सदा चव्हाण, अमोल रासम, कीर्तीकुमार राणे, सुभाष मालंडकर, प्रशांत राणे, नितीन राणे, विश्वरूप लाड आणि किशोर राणे आदी उपस्थित होते.