खारेपाटण जैन मंदिरात भगवान महावीर जन्मकल्याण उत्सव उत्साहात संपन्न!
देवगड -(प्रतिनिधी )
जैन धर्माचे २४ वे तीर्थकर भगवान महावीर यांच्या अहिंसा आणि शांती च्या शिकवणुकीची गरज आजच्या काळात जगाला आवश्यक आहे तिसऱ्या महायुद्धात संपूर्ण जगात अशांतता माजली असून भगवान महाविरांचे शांती अहिंसा ची शिकवण जगाला विश्वशांती नेवू शकते. त्या करीता भगवान महाविरांचे पर्यायाने जैन धर्माचे तत्वज्ञान घराघरात पोहचणे गरजेचे आहे. खारपाटेण येथील जैन श्रावक श्राविका यांनी खऱ्या अर्थाने जैन धर्माची संस्कृती टिकविली आणि जोपासली आहे. असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार जैन श्रावक दयानंद मांगले यांनी खारेपाटन येथील भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव सोहळ्यात बोलताना केली आणि जैन बांधवाना शुभेच्छा दिल्या.
१००८ भगवान महावीर जन्मकल्याण सोहळा जैन समाज सेवा सेवा मंडळ, श्री पद्मावती महिला मंडळ,अतिशय क्षेत्र खारेपाटण येथील जैन मंदिरात जैन श्रावक जेष्ठ पत्रकार दयानंद मांगले यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे तेजस जमदाडे, प्रा अरुण नाकील जेष्ठ श्रावक सखाराम साळवी, आप्पा साळवी, अध्यक्ष विलास डोर्ले, उपाध्यक्ष पवन
कावळे यांच्या उपस्थितीत पार पडला.
सकाळी ६ ते ८.३०.वा पर्यंत मंगल गीते, ध्वजारोहण, पंचामृत अभिषेक, त्यानंतर सवाल, भगवान महावीर जन्मोत्सव,
उत्साहात पार पडला यात भगवान महावीर यांची माता होण्याचा मान सौ मंगला बापू कापसे, यांना प्राप्त झाला तसेच आत्याचा मान सौ कविता पवन कावळे, सौ राणी राहुल कावळे, बाळाला काजळ लावणे सौ नेहा तेजस जमदाडे, पाळण्याच्या चार दोऱ्यांचा मान सौ मोहिनी कावळे, अमृता ब्रम्हदंडे, सौ अमृता ब्रम्हदंडे, सौ स्वप्नाली
डोर्ले, सौ सायली डोर्ले, सुंठवडा वाटणे प्रा. अरुण नाकील,
सौधर्म इंद्र इंद्राणी पंचामृत अभिषेक विलास डोर्ले आणि संगीत आरतीचा मान श्री पद्मावती महिला मंडळ खारेपाटण यांना मिळाला.त
प्रास्तवीक मान्यवरांचा सन्मान गुणवंत विद्यार्थी गौरव त्यानंतr जैन विद्यार्थी विद्यार्थिनी आणि श्रविकांचा जैन धर्म गीत आधारित कार्यक्रम पार पडला.
सायंकाळी भगवान महावीर ची सवाद्य मिरवणूक पार पडली.











