मंडणगड | प्रतिनिधी : तहसिल कार्यालय मंडणगड यांच्यावतीने महसुल सप्ताहाचे औचीत्यसाधून 1 ऑगस्ट 2023 ते 6 ऑगस्ट 2023 या सात दिवसांचे कालावधीत तहसिलदार श्री.तानाजी शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 1 ऑगस्ट 2023 रोजी महसुल दिन आढावा व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय दापोली येथे महसुल दिनाचे कार्यक्रमास उपस्थिती व महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 अंतर्गत ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात आले. 2 ऑगस्ट 2023 रोजी शहरातील मुंडे महाविद्यालयात चला जाणुया शासनाच्या योजना व आवड शिक्षणाची तयारी उज्वल भविष्याची या विषयावर निवासी नायब तहसिलदार समीर सावंत व डॉ. भरत सोलापूरे यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजन कऱण्यात आला आहे. मॉडेल कॉलेज आंबडवे येथे तहसिलदार तानाजी शेजाळ हे शासनाच्या विविध योजना मतदार नोंदणी अभियान व विविध दाखल्याबांत बाबत मार्गदर्शन करणार आहेत. मंडळ अधिकारी प्रकाश साळवी इ – पीक पाहणी मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. बाबसाहेब आंबेडकर महाविद्यालयात आयोजीत कार्यक्रमात मंडळ अधिकारी म्हाप्रळ एस.के. गुरव हे शासनाच्या विविध योजनांचे मार्गदर्शन करणार आहेत. वेसवी येथील युवा संवाद कार्यक्रमात वेसवी मंडळ अधिकारी एस. आर. गायकवाड हे शासनाच्या विविध योजनांचे मार्गदर्शन करणार आहेत.
3 ऑगस्ट 2023 रोजी तहसिल कार्यालय मंडणगड येथे नैर्सर्गीक आपत्तीमध्ये बाधीत असलेल्या 17 कुटुंबाना लाभ देणे व आपत्ती विषय मार्गदर्शन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे याशिवाय महसुल मंडळ मंडणगड, म्हाप्रळ, देव्हारे, वेसवी येथे महसुल अदालत, वारस तपास झालेले सातबारा व फेरफार, सलोखा योजनेतील लाभार्थी, सातबारा व फेरफार वाटप व लाभार्थी निश्चीत करणे, पाणंद रस्ते मोकळे करणेबाबत मार्गदर्शन, दरडग्रस्त भागातील पुर्नवसबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 4 ऑगस्ट 2023 तहसिल कार्यालय मंडणगड सह महसुल मंडळ मंडणगड, म्हाप्रळ, देव्हारे, वेसवी येथे कुळवहीवाट दावे, आदीवासी समाजाची 17 ब प्रकरणे निकाली करणे, अधिकार अभिलेखा विषय असलेल्या तक्रारींचे निवारण करणे, सलोखा योजना, तलाठी व मंडळ अधिकारी स्तरावरील अर्ज निकाली करणे, प्रलंबित फेरफार निकाली करणे, आपले सरकर पोर्टलवरील अर्ज निकाली करणे, वारस तपास झालेले, सातबारा व फेरफार वाटप तसेत अधिकार अभिलेखा विषयक असलेल्या विविध तक्रांरींचे निवारण कऱण्यात येणार आहे. 5 ऑगस्ट 2023 रोजी सैनिकांसाठी राखीव असून यात सैनिकांशी प्रत्यक्ष संवाद साधुन त्यांच्या अडी – अडचणी समाजवून घेवून त्यांना शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन कऱणे, शासनाचे प्रलंबीत मागणी अर्ज, महसुल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न निकाली कऱणेबाबत कार्यवाही तसेच मालमत्ता करातील सुटीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
6 ऑगस्ट 2023 रोजी महसुल संवर्गातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. महसुल संवर्गातील तालुक्यात कार्यरत तसे सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या प्रलंबित सेवा विषयक बाबी निकाली काढणेबाबत कार्यवाही व कर्मचारी यांचे महसुल विषय बाबींचे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. सेवापुस्तक अद्ययावत करणे व ऑनलाईन करणेबाबत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजीत कऱण्यात आला आहे. 7 ऑगस्ट 2023 रोजी महसुल सप्ताहानिमीत्त आयोजीत विविध योजनांबाबत लोकप्रितनिधी, जेष्ठ नागरीक, सामजीक संस्था, प्रतिनिधी व विभागाचे अधिकारी व प्रसार माध्यम प्रतिनिधी यांच्या समवेत महसुल सप्ताह सांगता समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुकावासीयांनी या सप्ताहातील विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन तहसिल कार्यालयाचेवतीने करण्यात आले आहे. सप्ताहातील विविध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसिलदार समीर सावंत, मंडळ अधिकारी निलेश गोडघासे, संजय गुरव, प्रकाश साळवी,संतोष गायवाड, तलाठी श्री. ए.वाय सय्यद, एम. वाय. पवार, एस.एन.गावकर, ए.एस. पाटील, एम.ए. पंडीत, आर. एम. बद्रापुरे, यु.पी. घाटुळ, श्रीमती आर.ए.मुल्ला, एच.बी. ठोंबरे, सुरज गायकवाड यांच्यासह सर्व कर्मचारी मेहनत घेत आहेत.








