गुहागर | प्रतिनिधी
तालुक्यातील कुडली माटल वाडी येथील 37 वर्षीय बेपत्ता प्रौढाचा मृतदेह असोरे येथील जंगलात माळरानावरील झाडीझुडपात आढळून आला.
याबाबत गुहागर पोलिस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार,मयत संदीप बबन माटल (37)हे दिनांक 4 मार्च पासून घरातून बेपत्ता झाले होते. दरम्यान सकाळी 10 वाजल्यापासून बेपत्ता झाले होते. जवळपास महिनाभराच्या कालावधी नंतर त्यांचा मृतदेह असोरे येथील जलमय भागात माळरानावर झाडीझुडपात आढळून आला.याबाबत गुहागर पोलीस स्थानकात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अधिक तपास गुहागर पोलीस करत आहे.











