रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील मालगुंड भंडारवाडी येथे बेकायदेशिरपणे गावठी हातभटटीची दारु विक्रीसाठी बाळगणार्या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई मंगळवार 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.20 वा.करण्यात आली.
प्रसाद भालचंद्र खेउर (52) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.मंगळवारी सायंकाळी जयगड पोलिस मालगुंड भंडारवाडी येथून गस्त घालत असताना त्यांना तेथील एका घराच्या मागीस बाजुस माडबाग येथील जंगलमय भागात बेकायदेशिरपणे दारु विक्री करताना मिळून आला.त्याच्याकडून 450 रुपयांची 5 लिटर गावठी दारु जप्त करण्यात आली











