राधानगरी तालुक्यात एकाच गावात सहा ठिकाणी चोरी…

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

राधानगरी: तालुक्यातील गुडाळ गावात अज्ञात चोरट्याने एका रात्रीत तब्बल सहा घरांवर कमला मारत धाडसी घरपोळ्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना तीव्र झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आशिष पाटील (पत्रकार), प्रकाश पाटील, बाबुराव चौगुले, विजय माने (पोलीस) प्रकाश माळवी आणि एस.बी पाटील यांच्या घरांमध्ये चोरीचा प्रकार घडला आहे. संबंधित कुटुंबे बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्याने बंद घरांना लक्ष केले. घरात कोणी नसल्याचे खात्री करून चोरट्याने कडी कोयंडे तोडत घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटे उचकून सोने-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली.सकाळी घरमालक परतल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळतात, स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून तपास सुरू करण्यात आला असून प्राथमिक तपासात ही चोरी पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून संशयतांचा शोध सुरू आहे.दरम्यान या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापची लाट उसळली असून रात्रीच्या वेळी पोलीसग्रस्त वाढवावी अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.