रत्नागिरी ः प्रतिनिधी : रत्नागिरी रेल्वेस्टेशनच्या पार्किंग शेडमध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञाताने लांबवली.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना 27 जुलै रोजी पहाटे 2.45 ते 31 जुलै रोजी रात्री 11 वा.कालावधीत घडली आहे. याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार,त्यांनी आपली अॅक्टिव्हा (एमएच-08-एके-6586) दुचाकी रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथील रेल्वे स्टाफ करता असलेल्या पार्किंग शेडमध्ये पार्क केली होती.ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली.31 जुलै रोजी फिर्यादी पार्किंग शेडमध्ये गेले असता त्यांना आपली दुचाकी त्याठिकाणी दिसून आली नाही.दुचाकी चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.याप्रकरणी अज्ञाताविरोधात भादंवि कायदा कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे











