रत्नागिरी ः प्रतिनिधी
गाडीचे व्हिडिओ शुटिंग केलेला मोबाईल परत देण्यास नकार दिल्याच्या रागातून चुलत भावाला मारहाण केली. याप्रकरणी 5 जणांविरोधात बाणकोट पोलिस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना गुरुवार 2 एप्रिल रोजी रात्री 9.30 वा.सुमारास शिपोळे बंदर मंडणगड येथे घडली आहे.
रशिद शरीफ लांबे,सैफ रशिद लांबे,रेश्मा रशिद लांबे,नवाफ रशीद लांबे आणि रशिदचा जेसीबी ऑपरेटर (सर्व रा.शिपोळेबंदर मंडणगड,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात जमान सईद लांबे (47,रा.शिपोळे बदंर मंडणगड,रत्नागिरी) यांनी बाणकोट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी रात्री जमान लांबे आपल्या ताब्यातील दुचाकीवरुन घरी ज्ाात होते. त्यावेळी त्यांचा चुलत भाउ रशिद लांबे याने रस्त्याच्या मधोमध उभा राहून त्यांची थांबवली.
त्यानंतर फिर्यादीला तू माझ्या गाडीचे व्हिडिओ शुटिंग केली आहेस, त्याचा माझ्याकडे पुरावा असून तुझा मोबाईल दाखव असे सांगितले. फिर्यादीने मोबाईल देण्यास नकार दिल्यावर नवाबने फोन करुन इतर संशयितांना बोलावून घेतले. त्यानंतर सर्व संशयितांनी मिळून फिर्यादीचा मोबाईल हिसकावून घेत तो रस्त्यावर आपटून नुकसान केले. तसेच फिर्यादीला शिवीगाळ करत हातांच्या थापटांनी मारहाण केली. या झटापटीत फिर्यादीच्या खिशातील रोख 11 हजार 300 रुपये आणि एकसरी मंगळसूत्र कुठेतरी पडून गहाळ झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास बाणकोट पोलिस करत आहेत.













