मालवण मच्छी मार्केट शेडची तात्काळ दुरुस्ती करा

भाजप युवामोर्चा मालवण शहरच्या वतीने नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन

मालवण | प्रतिनिधी : मालवण मच्छिमार्केट येथील पत्रा शेड पूर्णपणे नादुरुस्त झाली आहे. अन्य समस्याही याठिकाणी आहेत. तरी सुरू झालेल्या मासेमारी हंगामाचा विचार करता मासे विक्री करणाऱ्या व मासे कापणाऱ्या विक्रेत्यांचा विचार करून तात्काळ उपाययोजना व्हावी. याबाबत निवेदन भाजप मालवण शहर युवा मोर्चाच्या वतीने मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे. भाजप युवमोर्चा मालवण शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांच्या वतीने हे निवेदन बुधवारी देण्यात आले. यावेळी सौरभ ताम्हणकर, निकित वराडकर, निनाद बादेकर, निषय पालेकर, सचिन तारी,राजा मांजरेकर, शुभम लुडबे, लुईस फर्नांडिस उपस्थित होते.मासळी मार्केट येथे अन्य समस्याही व्यावसायिक व मत्स्य विक्रेत्या महिला यांना भेडसावत आहेत. त्याबाबतही पाहणी करून कार्यवाही करावी असेही निवेदनात म्हटले आहे. याबाबत माहिती माजी खासदार निलेश राणे यांनाही देण्यात आली आहे. असे ललित चव्हाण यांनी सांगितले.