पाच जणांचे विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा नोंद
मंडणगड प्रतिनिधी दि. 05- मोबाईलमध्ये गाडी शुटींग केल्याचा राग मनात धरुन आपणास पाच जणांनी मारहाण केल्याची तक्रार जमान लांबे (47) राहणार शिपोळे बदर यांनी बाणकोट सागरी पोलीस स्थानकांना 3 एप्रिल 2026 रोजी दाखल केली.
शिपोळे बंदर येथे 2 एप्रिल 2026 रोजी रात्री साडे नऊ वाजता घडलेल्या या घटनेनंतर रशीद लांबे, सैफ लांबे, रेश्मा लांबे, शिद लांबे, नवाफ लांबे, व रशीद लांबे यांचा जेसीबी ऑपेरटर सर्व राहणार शिपोळे बंदर या पाच जणांचे विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीतील माहीतीनुसार फिर्यादी व आरोपी चुलत भाऊ आहेत 2 एप्रिल 2026 रोजी फिर्यादी हे शिपोळे बंदर येथील आपले घरी जात असताना रात्री साडे नऊ वाजता फिर्यादी यांचा चुलत भाऊ रशीद लांबे याने रस्त्याचे मधोमध उभे राहून फिर्यादी यांची गाडी अडवली. तु माझ्या गाडीचे व्हीडीवो शुटींग केली आहेस व तु शुटींग केल्याचा माझ्याकडे पुरावा आहे तुझा मोबाईल मला दाखव असे बोलला.
फिर्यादी यांनी त्याला त्यांचा मोबाईल देण्यास नकार दिल्याने आरोपी याने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच आरोपीत यांने आपले वडील रशीद व भाऊ सैफ यांना फोन करुन घटनास्थळी बोलावून घेतले. यापैकी सैफ याने फिर्यादी यांचा मोबाईल त्यांच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु फिर्यादी यांनी त्यांचा मोबाईल हातात घट्ट धरुन ठेवला. त्यामुळे आरोपीत रशीद लांबे याने फिर्यादी याना हाताने मारहण करुन फिर्यादी यांचा डावा त्यांचे गाडीचे गरम सायलंन्सला लावला त्यामुळे फिर्यादीचा डावा पाय पोटरीखाली भाजला व मुका मारही लागला. यावेळी आरोपीत यांनी फिर्यादी यांचा सॅमसंग कंपनीचा ए 24 हा मोबाईल त्यांचे हातातून हिसकावून घेऊन तो डांबरी रस्त्यावर आपटून त्यांचे नुकसान केले. याशिवाय आरोपीत यांचा जे.सी.बी ऑपरेटकर याने फिर्यादी यांचे खांदे पकडून त्याचे पाठीवर हाताने मारहण केली. या झटापटीत फिर्यादी यांचे खिशातील 11300 रुपयांची रोख रक्कम व पिवळ्य धातूचे एकसरी मंगळसूत्र कुठेतरी पडून गहाळ झाले. या घटनेनंतर रेश्मा लांबे या घटनास्थळी रेश्मा लांबे या घटनास्थळी आल्या व त्यांनी फिर्यादी यांचे शर्ट ओढून त्यांना शिवीगाळ केली या घटनेत जमान लांबे जखमी झाल्याने त्यांना शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या पाच जणाचे विरोधात बाणकोट सागरी पोलीस स्थानकात गुन्हा रजिस्टर नंबर 11/2026 भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 189(2) 189(4) 190 191(2) 191(3) 115(2) 118(1) 352 351(2) 324(4) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.










