गौरव पोंक्षे | माखजन
संगमेश्वर तालुक्यातील आरवली विद्युत उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या कडवई, कुंभारखाणी, माखजन आरवली पंचक्रोशीतील सर्व गावांमध्ये ६ एप्रिल रोजी विद्युत पुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत बंद राहणार आहे.अशी.माहिती महावितरण कडून देण्यात आली आहे.
आरवली विद्युत उपकेंद्र येथील ३३/११ केव्ही अंतर्गत पॉवर ट्रान्सफॉर्मर ची न्यूट्रल आर्थिंगचे काम करण्यात येणार आहे.वेळेपूर्वी काम पूर्ण झाल्यास फिडर सुरु करण्यात येतील अशी माहिती देण्यात आली आहे.
उकाडयामुळे लाही लाही होत असताना,ग्राहकांना आधी कळावे,व पिण्याचे पाणी व अन्य अत्यावश्यक बाबी वेळेपूर्वी करून घ्याव्यात यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.












