मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री स्वामी समर्थांचे मुळस्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमध्ये ०३ एप्रिल पासून श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवास मोठ्या भक्तीभावाने व अपार श्रध्देने प्रारंभ झाल्याची असल्याची माहिती मंदीर समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. श्री स्वामी समर्थांच्या या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवात ०३ एप्रिल २०२६ ते १४/०४/२०२६ अखेर धर्म संकीर्तन महोत्सव व भजनसेवा संपन्न होणार आहे. यामध्ये दुपारी ४ ते सायंकाळी ७ यावेळेत देवस्थानचे मा.स्वामी सेवक कै.कल्याणराव इंगळे सभा मंडपात ०३ एप्रिल रोजी नाशिक येथील मीरा कुलकर्णी व सहकारी यांची भक्ती संगीत सेवा, दि.०४ एप्रिल रोजी गोवा येथील गोमंतक कीर्तन विद्यालय यांच्या वतीने बालचक्री कीर्तन सेवा, दि.०५ एप्रिल रोजी अंबरनाथ येथील श्री राजेंद्र अहिरराव व सहकारी यांची भक्ती संगीत सेवा आदी कात्यक्रम झाले. दि.०६ एप्रिल रोजी सोलापूर येथील ह.भ.प.माधव कुलकर्णी यांची प्रवचन सेवा व सोलापूर येथील कनिष्का शिवपुजे व सहकलाकार यांची भक्ती संगीत सेवा, दि.०७ एप्रिल रोजी कल्याण येथील ह.भ.प.श्री.गणेश बुवा गाडगीळ यांची नारदीय कीर्तन सेवा, दि.०८ एप्रिल रोजी मुंबई येथील श्रद्धा शिंदे व सहकलाकार यांची कथ्थक नृत्याविष्कार सेवा व प्रतीक जेऊरगी व सहकलाकार यांची भक्ती संगीत सेवा, दि.०९ एप्रिल रोजी अक्कलकोट येथील सौ.आरती प्रसाद काळे मॅडम यांची प्रवचन सेवा, सोलापूर येथील कु.रसिका-सानिका कुलकर्णी यांची भक्ती संगीत सेवा,
दि.१० एप्रिल रोजी पुणे येथील ह.भ.प. श्री ज्ञानेश्वर धानोरकर यांची नारदीय कीर्तन सेवा, दि.११ एप्रिल रोजी सौरभ काटगावकर व सहकारी पुणे यांची भक्ती संगीत सेवा, दि.१२ एप्रिल रोजी मुंबई येथील युवा गायक प्रथमेश लघाटे व सहकारी यांची भक्ती संगीत सेवा, दि.१३ एप्रिल रोजी पुणे येथील ह.भ.प.सीमा अयाचित यांची नारदीय कीर्तन सेवा, दि.१४ एप्रिल रोजी मुंबई येथील पंडित श्री.हेमंत पेंडसे व सहकारी यांची भक्ती संगीत सेवा, दि.१५ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थांचा पुण्यतिथी उत्सव, दर्शन, प्रसाद, पालखी सोहळा, दि.१६ एप्रिल रोजी गोपाळकाला इत्यादी कार्यक्रम संपन्न होतील, तसेच दिनांक ०३ एप्रिल ते दिनांक १४ एप्रिल अखेर दुपारी १२ ते ४ यावेळेत परगावच्या व स्थानिक भजनी मंडळांची भजनसेवा देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात संपन्न होतील. शनिवार दि.०४ एप्रिल ते मंगळवार दि.१४ एप्रिल अखेर सकाळी ८ ते ११ या वेळेत देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात श्री गुरुलिलामृत पोथीची सामुदायिक पारायण सेवा पार पडेल. दिनांक ०८ एप्रिल ते दिनांक १५ एप्रिल सकाळी ७ पर्यंत अखंड नामवीणा सप्ताह सोहळा संपन्न होईल, तरी सर्व स्वामी भक्तांनी या आध्यात्मिक कार्यक्रमांचा व श्रींच्या नित्य दर्शना बरोबर नित्य श्रवण, मनन, चिंतन या सेवेचाही लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी भाविकांना केले आहे.












