खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धा
आंतरराष्ट्रीय खेळाडूंची प्रमुख उपस्थिती
वैभववाडी l प्रतिनिधी : नाधवडे येथे सिंधूनायक चषक क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज सायंकाळी 7 वाजता संपन्न होणार आहे. माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेटच्या महासंग्रामाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, सिंधुदुर्ग भाजपा अध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पालकमंत्री मा. नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आंतराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग असणारी ही स्पर्धा आहे. ही स्पर्धा प्रकाशझोतात 5 ते 9 एप्रिल या कालावधीत खेळवली जाणार आहे.
या स्पर्धेत एकूण 64 संघांचा सहभाग राहणार आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास 5 लाख 75 हजार 575 रुपये तर द्वितीय क्रमांकास 2 लाख 75 हजार 575 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व सामनावीर यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच महिला व पुरुषांसाठी विशेष लकी ड्रॉ काढण्यात येणार असून त्यामध्ये विविध बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कणकवली, देवगड व वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.












