शिक्षक समिती शाखा वेंगुर्ला महिला आघाडी यांच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद
वेंगुर्ले : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वेंगुर्ला महिला आघाडी यांचा विविध उपक्रमांनी युक्त असा “वसा दातृत्वाचा” हा अभिनव कार्यक्रम जागतिक महिला दिना चे औचित्य साधून विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष प्रसाद जाधव सर होते, या कार्यक्रमाला तालुका शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र कोनकर सर , राज्यपदाधिकारी श्री.सचिन मदने तसेच जुनी पेन्शन संघटना राज्यपदाधिकारी राजू वजराटकर व कोकण विभाग सचिव संतोष परब, जिल्हा कोषाध्यक्ष कालिदास खानोलकर, जिल्हा कार्या. चिटणीस कर्पूरगौर जाधव उपस्थित होते. तसेच तालुका पदाधिकारी सचिव रामा पोळजी, शिक्षक नेते सीताराम नाईक, वेंगुर्ला शिक्षक पतपेढी संचालक सीताराम लांबर, महिला आघाडी अध्यक्षा ऋतिका राऊळ, सचिव सरोज जानकर, शिक्षक नेत्या नेहा गावडे, सल्लागार भाऊ आजगावकर, एकनाथ जानकर, प्रतिमा पेडणेकर, देवयानी आजगावकर उपस्थित होते. तसेच तालुक्यातील शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी महिलांच्या सशक्तीकरणाचे महत्त्व अधोरेखित करत मार्गदर्शन केले. त्यानंतर वसा दातृत्वाचा या उपक्रमांतर्गत कु. रितिका प्रकाश गोसावी. रा. होडावडे या आई -वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलीला आर्थिक मदत म्हणून संघटनेमार्फत धनादेश देण्यात आला. तसेच अपंगत्वावर मात करत क्रिकेट या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल स्मिता गावडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात शालेय विद्यार्थिनींनीसाठी तीन गटांत वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
यामध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या गटामध्ये प्रथम क्रमांक- कु. आध्या ललित खापरे (वेंगुर्ले नं. १), द्वितीय क्रमांक-कु कनिका कुणाल इंदुलकर (शिवाजी प्रागतिक), तर तृतीय क्रमांक- कु.परी नितीन सडवेलकर(राणी लक्ष्मीबाई) यांनी पटकाविला. इयत्ता तिसरी ते पाचवीच्या गटात प्रथम क्रमांक- कु. सान्वी सहदेव परब (परबवाडा नं.१ ), द्वितीय क्रमांक कु. स्वरा सत्यवान बरकुटे ( मातोंड पेंढऱ्याचीवाडी) तर तृतीय क्रमांक कु. प्रांजल रुपेश नार्वेकर ( उभादांडा नं. ३) यांनी पटकाविला. इयत्ता सहावी ते सातवीच्या गटात प्रथम क्रमांक कु. श्रुती दिनार मराठे (मठ नं.२), द्वितीय क्रमांक कु. हर्षिता सतीश मुळीक ( परबवाडा नं.१) तर तृतीय क्रमांक कु. गायत्री दत्तप्रसाद कावले ( मठ नं २) या विद्यार्थ्यांनी पटकाविला. या स्पर्धेचे परीक्षण श्रीम. खानोलकर मॅडम, श्रीम. तेरसे मॅडम, श्रीम. शितोळे मॅडम, श्रीम. मार्गी मॅडम, श्री.कर्पूरगौर जाधव सर व श्री. देसाई सर यांनी केले.
तसेच सन्माननीय श्री. रामचंद्र (भाऊ) कोनकर (विस्तार अधिकारी वेंगुर्ला), श्रीम. उर्मिला वेंगुर्लेकर ( मुख्याध्यापिका वेंगुर्ले नं. २), व श्री. उदय साळकर ( मुख्याध्यापक शाळा दाभोस) यांचा यशस्वी सेवापूर्ती साठी मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. योगिता सातपुते यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीम. राशी पोळजी यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिक्षक, महिला व नागरिक उपस्थित होते.













