जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत यांची प्रमुख उपस्थिती
खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
प्रतिनिधी प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सिंधूनायक क्रिकेट स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा नाधवडे येथील मैदानावर पार पडला. जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या शुभहस्ते उदघाटन पार पडले.
यावेळी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, वैभववाडी सभापती सिध्देश रावराणे, कणकवली सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनु सावंत, भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, कणकवली मंडळाध्यक्ष दिलीप तळेकर, देवगड मंडळाध्यक्ष बंड्या नारकर, मिलिंद मेस्त्री, वैभववाडी मंडलाध्यक्ष सुधीर नकाशे, माजी उपाध्यक्ष नासीर काझी, जि. प. सदस्य श्रावणी रावराणे, रिद्धी सुतार, जि.प.सदस्य संतोष पारकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष निसार शेख, व्यापारी संघटना जिल्हाध्यक्ष संजय सावंत, माजी सभापती जयेंद्र रावराणे, बाळा जठार, कलाकार मानधन समिती अध्यक्ष संतोष कानडे, माजी सभापती बाप्पी मांजरेकर, पं.स.सदस्य सहदेव खाडये, राजा जाधव, देवानंद पालांडे, शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश गुरव, अजय रावराणे, संजय चव्हाण, राजा राणे, सुवर्णा संसारे, बंडया मांजरेकर, व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहीला सामना वरवडे संघ आणि नाधवडे संघ यांच्यात पार पडला. तुळशीदास रावराणे यांच्या शुभहस्ते नाणेफेक करण्यात आली. निवेदन निलेश पवार यांनी केले.
या स्पर्धेसाठी विविध राज्यातील खेळाडू तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडू दाखल झाले आहेत. पाच दिवस ही स्पर्धा सुरू राहणार आहे. कणकवली, देवगडव व वैभववाडी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने या स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे.












