मंडणगड प्रतिनिधी : तालुक्यातील लाटवण – पिंपळगाव (रामवाडी) येथील नदीवर माणसाच्या रहदारीकरिता नव्याने बांधकाम सुरु असलेल्या नवीन साकवाचा स्लँब पूर्ण होण्या आधी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तांत्रीक दोषाचे कारण देत ठेकेदारास तोडण्यास सांगीतल्याचे बांधकाम विभागाकडून आज स्पष्ट करण्यात आले.
विकासकामांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या कामाचे संदर्भात स्थानीकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नमुद ठिकाणी पुलाचे बांधकाम काही दिवसांपासून सुरू होते. सुरुवातीपासूनच कामाच्या दर्जाबाबत स्थानिक नागरिकांकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली जात होती. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे, बांधकामातील तांत्रिक त्रुटी याबाबत वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. दरम्यान 4 एप्रिल 2026 रोजी दुपारच्या सुमारास अचानक साकवाचा एक मोठा भाग जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांनी घटनास्थळी जाऊन ठेकेदास पाडण्याच्या सुचना दिल्याची माहिती सबंधित बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री. जाधव यांनी सांगितले. चुकीच्या पध्दतीने तयार झालेला स्लँब पाडण्यात आला. त्यामुळे भविष्यातील धोकादायक घटना किंवा अपघाताचे प्रसंग टाळले गेले आहेत. दरम्यान पिंपळगाव येथील स्थानीक ग्रामस्थांनी येथे नवीन पुलाचे काम पावसापुर्वी पुर्ण कऱण्याची मागणी या निमीत्ताने केली आहे.
या संदर्भात संबंधीत विभागाचे शाखा अभियंता श्री. आकाश जाधव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पुलाचे स्लँबमध्ये तांत्रीक दोष आढल्याने बांधकाम विभागाने संबंधीत ठेकेदार एजन्सी यांना तो स्लँब तोडण्याच्या सुचना केल्या असल्याचे सांगीतले. त्यानुसार 4 एप्रिल 2026 रोजी संबंधीत एजन्सीने तो स्लँब तोडला असल्याचे तसेच आगामी काळात या ठिकाणी उत्तम दर्जा असलेल्या पुलाचे काम पुर्ण करणार असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.













