खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान; मंडणगडमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून उत्साहात स्वागत
मंडणगड (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलच्या महिला सेलच्या मंडणगड तालुकाध्यक्षपदी शाहीन मोहम्मद सलीम सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी मंडणगड येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या नियुक्तीची घोषणा अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी केली. त्यांच्या निवडीमुळे मंडणगड तालुक्यातील अल्पसंख्याक महिला संघटनेच्या कार्याला नवी ऊर्जा मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
या नियुक्तीवेळी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, महिला जिल्हाध्यक्ष साधना बोतरे मंडणगड तालुकाध्यक्ष मुझफ्पर मकादम, ज्येष्ठ कार्यकर्ते संदीप राजपुरे, जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर, भाई पोस्टुरे, मुजफ्फर लोगडे, मसूद कोंडकर, मझर हसवारे, मुस्ताक मिरकर, हसरत खोपटकर, खालिल कारविनकर, सलीम सय्यद, सिकंदर जिवरक, समद मांडलेकर गणेश सावर्डेकर राकेश साळुंखे साईराज सावंत यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.नियुक्तीपत्र प्रदान करताना खासदार सुनील तटकरे यांनी शाहीन सय्यद यांचे अभिनंदन केले. महिलांनी राजकारणात पुढे येऊन नेतृत्व करावे, महिलांचे प्रश्न मांडावेत आणि समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.
नियुक्तीची घोषणा होताच मंडणगडमधील पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शाहीना सय्यद यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. जाकीर शेकासन यांनी या नियुक्तीमुळे तालुक्यातील अल्पसंख्याक महिला संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.
नवीन जबाबदारीबाबत बोलताना शाहीन सय्यद यांनी पक्षनेतृत्वाचे आभार मानले. सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून ग्रामीण भागातील महिलांना संघटित करणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, महिलांचे प्रश्न सोडविणे आणि तरुण-तरुणींना पक्षाच्या विचारधारेशी जोडणे यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.














