सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी :
कोकणचे भाग्यविधाते, माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच अमृत महोत्सवी वर्ष वाढदिवस सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या अमृत महोत्सवानिमित्त बॅ. नाथ पै सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच सामाजिक भावनेतून रुग्णांना फळ वाटप, गरजूंना धान्य वाटप, वृक्ष वाटप आणि अनाथाश्रमांना मदत दिली जाणार आहे.
महिला आघाडीच्या वतीनेही विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये लहान मुलांसाठी वेशभूषा व प्रश्नमंजुषा स्पर्धा, महिलांसाठी पाककला स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पत्रकार भगिनी, महिला कीर्तनकार आणि विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जाणार असल्याची माहिती महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख संजू परब, महिला आघाडी जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, परिक्षीत मांजरेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.











