रत्नागिरीत ‘क्रेडिट कार्ड इन्शुरन्स’च्या नावाखाली तरुणाला ८८ हजारांचा गंडा

रत्नागिरी ः प्रतिनिधी
एसबीआय क्रेडिट कार्डचे इन्शूरन्स डिॲक्टिवेट करण्याची प्रोसेस सांगण्याच्या नावाखाली अज्ञाताने तरुणाचे तब्बल 88 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना 12 फेब्रुवारी 2026 रोज्ाी दुपारी 12.30 ते 1.11 वा.कालावधीत टिआरपी येथील यामाहा शोरुममध्ये घडली आहे.

प्रसाद रघूनाथ यादव (31,रा.सौम्या रेसिडेन्सी श्रीरामनगर नाचणे,रत्नागिरी) यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात सोमवार 6 एप्रिल रोजी तक्रार दिली आहे. त्यानुसार, 12 फेब्रुवारी रोजी प्रसाद यादव हे टिआरपी येथील यामाहा शोरुममध्ये नोकरी निमित्त असताना त्यांच्या मोबाईलवर अज्ञाताने एसबीआय क्रेडिट कार्ड नावाने फोन केला. त्यानंतर त्याने फिर्यादीला एसबीआय क्रेडिट कार्डवर इन्शूरन्सबाबत विचारणा करुन त्याचा इन्शूरन्स डिॲक्टिवेट करण्याची फोसेस सांगण्यास सुरुवात केली. हे संभाषण होत असताना त्या अज्ञाताने फिर्यादीच्या व्हॉटसॲपवर लिंक पाठवून त्याव्दारे फिर्यादीची वैयक्तिक माहिती भरुन घेतली. त्यानंतर फिर्यादीच्या क्रेडिट कार्डवरुन 87 हजार 642 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.