लांजा (प्रतिनिधी): सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा बक्षिस वितरण समारंभ रविवार दिनांक १२ एप्रिल रोजी आमदार किरण ऊर्फ भैय्या सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी येथे होणार संपन्न होणार आहे.
युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा २०२६चे आयोजन जानेवारी महिन्यात करण्यात आले होते.या परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली आहे.गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षक सत्कार सोहळा समारंभ रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, साळवी स्टाॅप, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे.
या बक्षिस वितरण सोहळ्यात विमानाने इस्त्रो सफरीसाठी निवड झालेले १५ विद्यार्थी, गोवा सायन्स सेंटर भेटी साठी निवड झालेले १० विद्यार्थी तसेच रत्नागिरी जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झालेले प्रत्येक इयत्तेतील पहिल्या दहा व तालुका गुणवत्ता यादीत निवड झालेले प्रत्येक इयत्तेतील पहिल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, मेडल्स व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या औचित्याने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या एक प्राथमिक व एक माध्यमिक शिक्षकाला युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्कार -२०२६ने गौरविण्यात येणार आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.
यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके, शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, प्राथमिक शिक्षाधिकारी श्रीम. निलिमा नाईक, ऋषिकेश भोगले, सर्व प्राथमिक शिक्षक संघटना प्रतिनिधी आदी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी या बक्षीस वितरण समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत,जि.प. सिंधुदुर्गच्या माजी अध्यक्षा सौ.संजना संदेश सावंत यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा प्रमुख सुशांत मर्गज,रत्नागिरी जिल्हा समन्वयक श्रीधर दळवी यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.












