अखेर महामार्गाचे खड्डे काँक्रीटने बुजवायला सुरवात.

गौरव पोंक्षे माखजन:
मुंबई गोवा महामार्गाचे चौपादरीकरणाचे काम सध्या धिम्या गतीने सुरु आहे.काम पूर्ण झाल्यावर याचं रस्त्याला पनवेल कन्याकुमारी असा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ असे ओळखले जाईल.या रस्त्याच्या लोकार्पणापूर्वीच रत्याचे तीन तेरा झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती.
सर्वत्र पडलेले खड्डे,भेगा आणि काँक्रिट मधून बाहेर आलेल्या शिगा.हे वास्तव सचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते.
याची तात्काळ दखल संबंधित खात्याने घेतली असून,परशुराम पासून खेरशेत टोलनाका इथपर्यंत ठेका घेतलेल्या ‘इगलं’ कंपनी ने हे काम हाती घेतले आहे.१० वर्षे डागडुजी करण्याचे काम या कंपनी कडे आहे.
अनेक ठिकाणी बाहेर आलेल्या शिगा,आणि दूर दूर पर्यंत पडलेल्या भेगा यामुळे रस्त्याच्या कामाचा दर्जा सहजतेने कळून येत आहे.परंतु याकडे केंद्र शासन याकडे दुर्लक्ष का करत आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. कंपनी कडून करण्यात येणारी मलमपट्टी कितपत फायद्याची ठरणार हे पाहावेच लागेल.
जलद गतीने जाणारी वाहने आणि अचानक येणारे खड्डे,भेगा,बाहेर आलेल्या शिगा यामुळे मोठा अपघात होऊज शकतो.अनेक वेळा खड्डा न समजल्यामुळे दुचाकिस्वारांचे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.याकडे केंद्र शासनाने लक्ष द्यायला हवे.
काँक्रिटीकरणाचे काम हे रात्री थंड वेळी खर तर करण्यात येते.मात्र भेगा आणि खड्डे भरण्याचे काम हे दुपारी रखरखत्या उन्हात सुरु आहे.म हे काम लोकांच्या समाधानासाठी का असा सवाल उपस्थित केला जात आहे.