अजित पवारांच्या पश्चात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे?

राजकीय वर्तुळाच्या नजरा मुख्यमंत्र्यांकडे
अजित पवारांच्या नावे विक्रम
अजित पवार यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत आतापर्यंत दहा वेळा राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला असून, सर्वाधिक वेळा बजेट मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाची शैली, शेरोशायरी आणि ठळक घोषणा यांची नेहमीच चर्चा होत असे. यंदाही त्यांच्या बजेटकडून राज्याला मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र काळाने त्याआधीच त्यांच्यावर झडप घातली.
अर्थ खाते कोणाकडे?
दरम्यान, महायुती सरकारमध्ये अर्थखाते हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले होते. त्यामुळे हे खाते पुन्हा त्याच गटातील एखाद्या ज्येष्ठ नेत्याकडे सोपवले जाणार की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडेच ठेवणार, यावर महायुतीच्या कोअर कमिटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत राज्याचा आर्थिक डोलारा सावरण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री हे खाते स्वतःकडे ठेवतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.