माखजन वार्ताहर:
संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील शिवसेना विभागप्रमुख,बुरंबाड चे माजी सरपंच आणि माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोज शिंदे यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ अस्मिता केंद्रे यांची भेट घेतली
या भेटीवेळी कळंबुशी गावचे सरपंच सचिन चव्हाण,आतिष चव्हाण,सुमित चव्हाण उपस्थित होते.यावेळी त्यांनी सौ अस्मिता केंद्रे यांना शुभेच्छा दिल्या व काही प्रलंबित कामांविषयी,शैक्षणिक समस्यांविषयी चर्चा केली.












