हरकुळ बुद्रुकमध्ये नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

‘गणेश याग’पासून कार्यक्रमाची सुरुवात; दिवसभर उपक्रमांची रेलचेल

कणकवली : कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हरकुळ बुद्रुक विभागामध्ये विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ९ एप्रिल रोजी हरकुळ खुर्द येथील श्री शृंगेश्वर गणपती मंदिरात सकाळी ८ वाजता ‘गणेश याग’ने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.

१०० ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान; महाप्रसादाचे आयोजन
दुपारी १२ वाजता ७५ वर्षांवरील १०० ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान समारंभ पार पडणार आहे. तसेच दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

दशावतारी नाटक; सांस्कृतिक मेजवानी आयोजित केली आहे.
रात्री ९ वाजता पारंपरिक दशावतारी नाटक सादर करण्यात येणार असून, नागरिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची विशेष मेजवानी असणार आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांचा पुढाकार; उपस्थितीचे आवाहन
या उपक्रमाचे आयोजन हरकुळ बुद्रुक विभागातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले असून, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांच्या पुढाकारातून कार्यक्रम पार पडणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक एकोपा आणि संस्कृती जपण्याचा संदेश
नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली कोकणच्या विकासाला नवे बळ मिळाले असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमांमधून सामाजिक एकोपा आणि संस्कृती जपण्याचा संदेश दिला जात आहे.