माजगाव सब स्टेशन वरून येणाऱ्या वीजेच्या अर्धवट कामाबाबत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसह ठेकेदाराला विचारला जाब

ओटवणे (प्रतिनीधी) ओटवणे गावाला माजगाव सबस्टेशन वरून वीज पुरवठा व्हावा यासाठी असणारी वर्षानुवर्ष असलेली मागणी पूर्ण झाली मात्र हे सूरू झालेले काम अर्धवट स्थितीत वर्षभर बंद आहे आणि याचा जाब वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात जात विचारल्या नंतर समाधान न झालेल्या ग्रामस्थांनी ओटवणे ग्रामपंचायत येते संबंधित अधिकारी ठेकेदार यांना बोलवून घेत वस्तुस्थिती नेमकी काय आहे याचा खुलासा मागितला.चार दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात जात जाब विचारला होता त्यावेळी दिलेली उत्तरे ही समर्पक नसल्याने तसेच माजगाव सब स्टेशन वरून ओटवणे गावाला जोडणाऱ्या लाईन चे काम अर्धवट स्थितीत असल्याने त्या संबंधित ठेकेदार तसेच या विद्युत वाहिन्या वरूनच जो सप्लाय मे. जय गणेश मिनरलस् विलवडेला जाणार आहे त्या कंपनीचे अधिकारी आणि वन खाते या सर्वांनाच ग्रामस्थांच्या समोर आणत या समस्येबाबत जाब विचारला मात्र या कामासाठी लागणारा अतिरिक्त नीधी आणि ते करणे ठेकेदाराला शक्य नसल्यामुळे आणि हा भार वीज वितरण ला सोसणारा नसल्याने हे काम सध्या अपूर्णा अवस्थेत असल्याचा खुलासा संबंधित ठेकेदार परब यांनी दिला .

हे काम करण्यासाठी वनखात्याच्या जंगल भागातून विद्युत वाहिनी न्यावी लागेल यासाठी दोन पर्याय अंडर ग्राउंड किंव्हा पोल वरून न्यायचे अंडर ग्राउंड न्यायचे तर हा खर्च ठेकेदाराला न परवडणारा आणि याच भागातून खांब घातल्यास होणारा अतिरीक्त खर्च काही प्रमाणत टाळता येवू शकतो तर यासाठी वनखाते परवानगी देत नाही.आणि जर या मार्गाच्या व्यतिरिक्त शेवटचा पर्याय म्हणजे विद्युत वाहिन्या वन खात्याच्या बाहेरून नेणे तर तो परिसर जंगलमय पुन्हा समस्या आणि हाही खर्च ठेकेदाराला परवडणारा नाही. त्यामूळे यात माजगाव सब स्टेशन वरून वीज ओटवणेला मिळेल याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. तरी यातून योग्य तो तोडगा वनखाते, वीज वितरण कंपनी , ठेकेदार आणि याच्याशी संबंधित मे.जय गणेश मीनरल्स ने ग्रामस्थांना विश्वासात घेत काढावा व हा प्रश्न मार्गी लावावा असेही आवाहन ग्रामस्थांनी केले. यावेळी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही आपण यावर योग्य तो तोडगा करण्यासाठी पाठपुरावा करू आणि हे काम मार्गी लावू असे आश्वासन दिले.

यावेळी गावातली अन्य विजेच्या समस्येबाबत ही ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सुनावले. यावेळी विज वितरण सहाय्यक अभियंता सुहास परब, कनिष्ठ अभियंता रवींद्र मोरे, वनरक्षक महादेव गेजगे, ठेकेदार एस.एस.परब, जय गणेश मिनरलस चे रोहीत नाडकर्णी ,उपसरपंच संतोष कासकर, ग्रा. सदस्य प्रशांत बुराण, महेश चव्हाण सह रवींद्र म्हापसेकर, उमेश म्हापसेकर,संतोष तावडे, संतोष भैरवकर, स्वप्नील उपरकर, रवींद्र गावकर, जयगणेश गावकर, प्रमोद केळुसकर, उज्वला बुराण, गजानन रासम, शशिकांत गोसावी, सत्यवान गावकर, अमेय गावडे, शेखर गावकर, सगुण गावकर, यशवंत वरणेकर, संतोष सावंत, गुरुनाथ बुराण, प्रभाकर गावकर, किरण गावकर, विनायक वर्णेकर, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.