
ग्रामस्थात भीतीचे वातावरण
आंबा,काजू बागायतीबरोबर भातशेतीचे नुकसान
शेतकरी हवालदिल
शिरगाव (वार्ताहर) साळशी व चाफेड परिसरातील जंगलात गवारेड्याचे वास्तव्य असून आंबा, काजू बागायतीबरोबर भातशेतीची नासधूस करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत .देवगड तालुक्यातील साळशी, चाफेड ,कुवळे येथील परिसरातील जंगलात गवारेड्याचे वास्तव आहे.जंगलाची बेसुमार वृक्षतोड होत असल्यामुळे गवारेड्याचा कळप अन्न- पाण्याच्या शोधात मानवी वस्ती पर्यंत येऊन ठेपला आहे.तसेच गेेल्या ४ दिवसापूर्वी साळशी -चाफेड रस्त्याला लागूनच ५/६ गवारेड्याचा कळप दिवसाढवळ्या मुक्त संचार करताना साळशी येथील शेतकरी प्रभाकर साळसकर यांच्या दृष्टीस पडला होता.शांताराम रावले यांनाही ञिपुर शेतात गवारेडे दृष्टीस पडले होते.त्यामुळे ग्रामस्थांतून भीतीचे वातावरण पसरले आहे.
तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गवारेड्याचा कळप भातशेतीकडे वळला आहे. साळशी सरमळे वाडी येथील राजेंद्र सावंत,राजेंद्र साटम तसेच देवणेवाडी येथील दीपक सावंत यांची गवारेड्याने भातशेती खाऊन रोपे पायाने तुडवून नासधूस केली त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षी मेहेनत करून उभी केलेेल्या शेतीची गवारेडेकडून नासधूस होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहेगवारेड्यासारख्या वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी शेती करण्याकडेही पाठ फिरवली आहे.याबाबत वनविभागाने या समस्याकडे लक्ष देऊन पाहणी करून गवारेड्याचा बंदोबस्त करावा अशी शेतक-यातून मागणी होत आहे.












