देवगडमध्ये रिक्षा-टेम्पो चालकांना मोफत पेट्रोल वाटप

देवगड : माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा उर्फ निवृत्ती तारी आणि नगरसेविका प्रणाली माने यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड शहरातील रिक्षा व टेम्पो चालकांना मोफत पेट्रोलचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ सभापती बुवा तारी यांच्या हस्ते करण्यात आला.

 

या प्रसंगी माजी आमदार अजित गोगटे, भाजपा पदाधिकारी बाळ खडपे, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, योगेश पाटकर, वैभव कळंगुटकर, प्रणाली माने यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमाचा लाभ देवगडमधील शेकडो रिक्षा व टेम्पो चालकांनी घेतला.

 

दरम्यान, वाढदिवसानिमित्त देवगड येथील भाजपा कार्यालयात केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच ब्राह्मण देव मंदिर येथे लघुरुद्र विधी करून खासदार नारायण राणे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.