पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार अॅड. अजित गोगटे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बाळ खडपे यांच्या हस्ते करण्यात आले.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा व्यक्त करण्यापुरते मर्यादित न राहता समाजाप्रती असलेले कर्तव्य पार पाडण्याच्या उद्देशाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान हे राष्ट्रीय कर्तव्य मानून अनेक युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून या उपक्रमात सहभाग नोंदविला.

या प्रसंगी भाजप देवगड मंडळ अध्यक्ष राजा भुजबळ, पंचायत समिती सभापती गणेश राणे, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, देवगड मंडळ सरचिटणीस योगेश चांदोसकर, भाजप जिल्हा उपाध्यक्षा सौ. प्रियांका साळसकर, महिला तालुकाध्यक्षा उषःकला केळुस्कर, जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका प्रणाली माने, पाणीपुरवठा सभापती तथा नगरसेविका तन्वी चांदोसकर, ऋचाली पाटकर, मनीषा जामसंडेकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील, माजी शहराध्यक्ष योगेश पाटकर, कोषाध्यक्ष राजेंद्र वालकर, नगरसेवक संतोष तारी, गटनेते शरद टुकरूळ, रोहन खेडेकर, स्वच्छता सभापती बुवा तारी, माजी उपनगराध्यक्ष संजय तारकर तसेच माजी नगरसेवक व्ही. सी. खडपकर, ज्ञानेश्वर खवळे, सुभाष धुरी, बापू जुवाटकर, अक्षता घाडी, पंकज दुखंडे, उल्हास मणचेकर आणि मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.