तर कोकण विभाग अध्यक्षपदी आनंद त्रिपाठी यांची निवड
लांजा (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य अपंग (दिव्यांग) कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विलास गोरे यांची फेरनिवड तर तर कोकण विभाग अध्यक्षपदी आनंद त्रिपाठी यांची निवड करण्यात आली आहे.
संघटनेच्या नाशिक येथे झालेल्या बैठकीत संस्थापक अध्यक्ष दिगंबर घाडगे पाटील व नवनियुक्त राज्याध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या विद्यमान
कार्यकारिणीला कायम ठेवत तीन वर्ष मुदत वाढ देण्यात आली आहे .
तसेच जिल्हा कार्यवाह म्हणून काम पाहणारे आनंद त्रिपाठी यांची कोकण विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली.तसेच कार्याध्यक्ष अशोक जायभाय यांना राज्य उपाध्यक्ष पद देण्यात आले आहे. दरम्यान, सावर्डे – चिपळूण येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हा कार्यकारणी सभेमध्ये जिल्हाध्यक्ष विलास गोरे यांनी सदर नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
सद्यस्थितीत दिव्यांग कर्मचाऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीसाठी संघर्ष करावा लागत असून उठ सूट कोणीही दिव्यांगांच्या दिव्यांगत्वाची अधिकार नसतानाही तपासणीच्या नावाखाली मानसिक छळ करत आहेत अशा अधिकाऱ्यां विरोधात दिव्यांग हक्क कायदा २०१६ नुसार कारवाई करणार असल्याचे कोकण विभाग अध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी सांगितले. फेर पडताळणीच्या गोंडस नावाखाली जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग कर्मचारी व सर्वसामान्य दिव्यांग यांना प्रचंड मानसिक त्रास झाला असल्याचे उपस्थित दिव्यांग यांनी सांगितले.संघटनेला आर्थिक बळ मिळावे यासाठी सर्व सदस्यांनी वेळेवर लढा निधी द्यावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष गोरे यांनी केले. यावेळी सीईटी व सिटीईटी उत्तीर्ण सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.












