संगठन सृजन अभियान ” या कार्यक्रमांतर्गत काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले जाणार मार्गदर्शन

काँग्रेस भवन रत्नागिरी येथे रविवारी १२ एप्रिल रोजी सभेचे आयोजन

लांजा ( प्रतिनिधी): महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने संघटन सृजन अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेस भुवन रत्नागिरी येथे रविवारी १२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता सभा आयोजित करण्यात आली असून या सभेला सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष‌ नुरुद्दीन सय्यद यांनी केले आहे
या संपूर्ण जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी आयोजित सभेला मार्गदर्शन करण्यासाठी ऑल इंडिया काँग्रेसचे सेक्रेटरी दिनेश अब्रार तसेच महाराष्ट्र काँग्रेस चे निरीक्षक हनुमंत पवार, आदित्य पाटील, ॲड.श्रीमती श्रद्धा ठाकूर हे मान्यवर उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे या सभेदरम्यान जिल्हा काँग्रेस मधील विविध सेल, तसेच युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, यामधील पदाधिकारी यांची निवड करण्यात येणार आहे.
तरी रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेस चे सर्व ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी नगरसेवक, आजी- माजी जिल्हापरिषद सदस्य, आजी -माजी आमदार, बेसिक काँग्रेस चे सर्व तालूका अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस चे सर्व पदाधिकारी, तालुका कार्यकारिणी सदस्य, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, ओबीसी सेल चे सर्व पदाधिकारी, काँग्रेस सेवा दल चे सर्व पदाधिकारी, युवक काँग्रेस चे सर्व पदाधिकारी, महिला काँग्रेस चे सर्व पदाधिकारी, तसेच उत्तर -दक्षिण जिल्हा काँग्रेस चे सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांनी केले आहे.