प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सतत कार्यरत असलेले आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून कागल तालुक्यात आपली ओळख असलेले गोरंबे (ता.कागल) येथील तेजस चौगले यांची कागल तालुक्याच्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष नुकतीच निवड करण्यात आली आहे .
कागल येथील मटकरी मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा पदनियुक्ती सोहळा व बैठक संपन्न झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सतत कार्यरत असलेले गोरंबे येथील तेजस चौगले यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी नियुक्ती पत्र देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ, के.डी.सी.सी बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैय्या माने,जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत.तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.













