गौरव पोंक्षे | माखजन :
प्रत्येक हिंदूंच्या घरामध्ये होणारे नित्य संस्कारच अखंड हिंदू धर्म टिकवतील असा विश्वास डॉ जयश्री जोग यांनी व्यक्त केला.त्या आरवली नजीक खेरशेत येथे सकल हिंदू संमेलनात मार्गदर्शन करताना बोलत होत्या.हे संमेलन खेरशेत येथील भागीर्थीबाई राजेशिर्के सभागृहात झाल.याचे आयोजन सकल हिंदू समाज आरवली,बुरंबाड दशक्रोशी तर्फे करण्यात आले होते.
सौ.डॉ.जोग पुढे म्हणाल्या की अखंड हिंदुस्थानात हिंदूंना ताठ मानेने जगायच असेल तर इतिहासाचा तन्नीक अभ्यास करून,भविष्यातीचा संकटांना गाडण्याची तयारी ठेवायला हवी.असे नमूद केले.जाती पातीच्या राजकारणात न अडकता,आज हिंदू म्हणून एकत्र यायला हवे असे आवाहन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना दत्ताराम सोलकर यांनी,प्रत्येकाने आजूबाजूला हिंदू विरोधी घडत असलेल्या घटनांकडे उघड्या डोळ्यांनी बघायला हवे.लव्ह जिहाद सारख्या घटनांकडे ,आपण गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे नमूद केले.हिंदू ची व्याख्या अनेकांनी केली आहे.पण नुसत्या व्याख्या ऐकून उपयोगाच्या नाहीत.प्रत्येकाने हिंदू म्हणून जगल पाहिजे असे आवाहन केले.यावेळी अध्यक्ष विकास सुर्वे यांनी मार्गदर्शन केले.व्यासपीठावर उपाध्यक्ष अक्षय शिंदे,अरुण सरदेसाई उपस्थित होते.या सभेला बहुसंख्येने हिंदू समाज उपस्थित होता.या संमेलनाचे सूत्रसंचालन ओंकार नामजोशी यांनी केले.













