खेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) २०२४ च्या वर्ग १ गट अ अंतर्गत सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) पदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत डॉ. शुभांगी पाटील यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. रसायनशास्त्र विषयात त्यांनी राज्यात एकूण सहावा क्रमांक मिळवला असून महिला उमेदवारांमध्ये त्या प्रथम ठरल्या आहेत.
यापूर्वीही डॉ. पाटील यांनी एमपीएससी २०१५ परीक्षेत यश मिळवत सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पद भूषवले होते. त्यांच्या या नव्या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा त्यांची गुणवत्ता अधोरेखित झाली आहे.
आपल्या यशाबद्दल बोलताना डॉ. शुभांगी पाटील यांनी कुटुंबीयांचे विशेष आभार मानले. “कुटुंबियांचे प्रेम, पाठबळ आणि साथ नसती, तर हे यश शक्य झाले नसते,” असे त्यांनी नमूद केले.
डॉ. पाटील यांच्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रात तसेच समाजात त्यांचे कौतुक होत असून, अनेक विद्यार्थ्यांसाठी त्या प्रेरणादायी ठरत आहेत.













