⭕देवगड किल्ला येथे बॉक्स क्रिकेट स्पर्धा उत्साहात
⭕ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा
⭕भाजप युवामोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील यांच्या संकल्पनेतून उपक्रम
⭕सावंतवाडीचा विपुल भिसे ठरला मालिकावीर
🛑स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद, जिल्ह्यातील २४ संघ सहभागी
देवगड/ प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायणराव राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी युवामोर्चा देवगड- जामसंडे शहर विभाग पुरस्कृत व जी. सी. सी. देवगड किल्ला आयोजित भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धेत तनुष स्पोर्टस् सावंतवाडी संघाने विजेतेपद पटकावून ‘खासदार चषक २०२६’ वर आपले नाव कोरले. या संघाला रोख २० हजार रूपये व आकर्षक खासदार चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धा देवगड किल्ला येथील श्री हनुमान मंदिरानजीकच्या पटांगणावर मोठ्या उत्साहात पार पडल्या. प्रकाशझोतात खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. युवामोर्चाचे शहर अध्यक्ष दयानंद पाटील यांच्या संकल्पनेतून हा स्पर्धात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे देवगड मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, तालुका सरचिटणीस योगेश चांदोस्कर, युवामोर्चा तालुकाध्यक्ष अमित साटम, युवामोंर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, न. पं. पाणी पुरवठा समिती सभापती तन्वी चांदोस्कर, महिला मोर्चा शहर अध्यक्षा सौ. तन्वी शिंदे, स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत कावले, माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, संजय तारकर, योगेश पाटकर, उल्हास मणचेकर, युथ फोरम देवगडचे अध्यक्ष अॅड. सिद्धेश माणगावकर, रवींद्र कोयंडे, निनाद देशपांडे, ओंकार सारंग, श्रुती जाधव, दीपक जानकर आदी उपस्थित होते. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण २४ संघांनी सहभाग नोंदविला होता. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या स्पर्धेतील उपविजेत्या दिर्बा गणेश- मळई संघाला रोख १० हजार रूपये व चषक देऊन गौरविण्यात आले. तृतीय क्रमांकप्राप्त लिंगेश्वर स्पोर्टस्, कनेडी व चतुर्थ क्रमांकप्राप्त साईकृपा (अ) संघाला प्रत्येकी दोन हजार रूपये व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील मालिकावीर म्हणून विपुल भिसे (सावंतवाडी) याला गौरविण्यात आले. स्पर्धेतील उगवता तारा-मयुरेश बांदकर (मळई), उत्कृष्ट गोलंदाज यश गाड (सावंतवाडी), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक- आकाश (सावंतवाडी), उत्कृष्ट फलंदाज – प्रतिक पाटील (सावंतवाडी) यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
बक्षीस वितरणप्रसंगी भाजपचे देवगड मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, युवामोर्चा शहरअध्यक्ष दयानंद पाटील, महिला मोर्चा देवगड मंडल अध्यक्षा उषःकला केळुसकर, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, भाजपचे तालुका सरचिटणीस योगेश चांदोस्कर, न. पं. सभापती तन्वी चांदोस्कर, न. पं. बांधकाम सभापती रोहन खेडेकर, उमेश कणेरकर, तन्वी शिंदे, सर्फराज शेख, योगेश पाटकर, पंकज दुखंडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ऋत्विक धुरी यांनी केले.










