रानगव्याच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यु…

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

राधानगरी: तालुक्यातील पाल खुर्द येथे शनिवारी रानगव्याच्या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू झाल्या.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शामराव कोंडीबा कोराणे (रा.पाल खुर्द) ता.राधानगरी असे मृत वृद्धाचे नाव आहे
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने घराच्या पाठीमागे ते झाडाखाली बसले होते.त्याच वेळी जंगलातून खाली आलेल्या गव्याने त्यांच्यावर हल्ला चढवला.या हल्ल्यात रानगाव्याने त्यांच्या छातीत शिंग खुपसल्याने ते गंभीर जखमी झाले.उपचारासाठी त्यांना सीपीआर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकी करण्यात आली आहे.

दरम्यान राधानगरी परीसरात वारंवार वन्य प्राण्यांचे हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने प्राथमिक उपाययोजना कराव्यात,अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे