खेड (प्रतिनिधी) : स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना उद्या खेडमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. खेड तालुक्यातील सर्व संगीतप्रेमी एकत्र येत हुतात्मा अनंत कान्हेरे चौक येथे सायंकाळी ६ वाजता श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात आशाताईंच्या अमूल्य संगीत वारशाला उजाळा देत त्यांच्या गाण्यांच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. त्यांच्या सुरेल आवाजाने अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध केले असून, त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
खेडमधील सर्व संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आशाताई भोसले यांना आदरांजली वाहावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.










