डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांचे महा मानवाला अभिवादन

ओटवणे (प्रतिनिधी ) सावंतवाडी समाजमंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समन्वय समिती सावंतवाडी आणि तमाम तालुका वासिय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती उत्सवाला शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चीदानंद उर्फ संजू परब यांनी उपस्थित राहून परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी समन्वय समिती च्या वतीने विचार मंचावर त्यांचं स्वागत करण्यात आले.यावेळी सभेला संबोधित करताना सर्व समाज बांधवाना त्यांनी शुभेच्छा दिल्या.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा देताना त्यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.समाज कार्यासाठी, समाज बांधवांसाठी गरज भासेल त्या त्या वेळी आपलं सहकार्य नेहमीच समाजासाठी समाज बांधवांसाठी असेल अशा भावना व्यक्त केल्या यावेळी जिल्हा बँक संचालक विद्यादर परब, क्लेटस फर्नांडिज, उपनगराध्यक्ष अँड.अनिल निरवडेकर, सभापती सुश्मिता जाधव, समन्वय समिती अध्यक्ष जगदीश चव्हाण, गुंडू जाधव आदी उपस्थित होते.