माध्यमिक विद्यालय बिळवस येथे ६ मे रोजी ‘आजी-माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन’ सोहळ्याचे आयोजन!

मसुरे | झुंजार पेडणेकर :बिळवस ग्रामसेवा मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यालय, बिळवस हायस्कूल येथे ६ मे रोजी ‘आजी-माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने १९६८ पासून ते २०२६ पर्यंतचे सर्व आजी-माजी विद्यार्थी एकाच छताखाली जमणार असून, जुन्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे.

सकाळी ९.३० वाजता दीपप्रज्वलन आणि प्रास्ताविकाने कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. यानंतर सकाळी १०.३० वाजता शाळेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व माजी शिक्षकांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात येणार आहे. नवीन धोरण नुसार शाळा बंद होऊ नये यासाठी करावयाच्या उपाय योजनानवर चर्चा, दुपारी १२ वाजता शिक्षक आणि विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता होईल. उपस्थितीचे आवाहन माजी विध्यार्थी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.