लांजात रिक्षाची चोरी; कोल्हापूरच्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

लांजा:
लांजा ते दाभोळे रोडवर कोर्ले फाट्याजवळून एक रिक्षा चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कोल्हापूर येथील एका संशयित आरोपीला निष्पन्न केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुणाल अनिल सुर्वे (वय ३० वर्ष, रा. लांजा भटवाडी) यांची ८०,००० रुपये किमतीची रिक्षा (क्रमांक एम.एच. ०८- ए.एक्यु.३९२१) ही दि. ११ एप्रिल २०२६ रोजी रात्री १०:०० ते दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजेच्या दरम्यान कोर्ले फाट्याजवळ उभी होती. ही रिक्षा फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरून नेल्याची तक्रार १३ एप्रिल रोजी पहाटे लांजा पोलीस ठाण्यात देण्यात आली.

या चोरीप्रकरणी पोलिसांनी महेश रमेश यादव (वय ४२ वर्षे, रा. साई रेसिडन्सी शिंगणापूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा (गु.र.नं. ७९/२०२६) दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.