आंबवडे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे अभिवादन

खेड (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मंडणगड तालुक्यातील आंबवडे येथे भेट देऊन त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.
दापोली विधानसभा मतदारसंघातील मंडणगड तालुक्यातील आंबवडे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ असून या ठिकाणी दरवर्षी मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली जाते. यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्मारकस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी स्थानिक नागरिक, पदाधिकारी व आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच बाबासाहेबांच्या विचारांचा समाजावर असलेला प्रभाव अधोरेखित करत त्यांच्या कार्याचा आदर्श घेण्याचे आवाहन करण्यात आले.