गौरव पोंक्षे | माखजन
फार पूर्वी पासून सुरु असलेली भारतीय शिक्षण पद्धती ही त्या त्या काळाची गरज ओळखून सुरु होती.आता जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येत आहे ते आधुनिक काळाला सांगड घालणारे ठरेल असे प्रतिपादन निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.ते चिपळूण च्या ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात काल, आज ,उद्याची शिक्षण पद्धती यावर बोलत होते.विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल चिपळूण आयोजित स्व.माधवराव परांजपे स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.
श्री धर्माधिकारी पुढे म्हणाले आजवर ची शैक्षणिक धोरणांची दुर्दैवाने प्रभावी पणे अमलबजावणी पासून वंचित राहिली ,आत्ताचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे सूक्ष्म अभ्यास करून बनवले.गेले आहे.फक्त प्रभावीपणे अमलबजावणी व्हयला हवी असे नमूद केले.आधुनिक काळात,ज्या शिक्षणाची गरज आहे.ती गरज राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला.
प्रत्येकाने जीवनात यशस्वी व्हयच असेल तर ‘स्व’ ची ओळख करून घे.हेच खरे शिक्षणाचे मूळ सूत्र असल्याचे नमूद केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बाबासाहेबाना आदरांजली वाहताना,बाबासाहेब म्हणजे ज्ञानसूर्य होते.आणि ते भारताचेच नाही तर विश्वाला दिशा देणारे होते अस म्हणत, डॉ बाबासाहेबाना भारतरत्न दिला गेला.तर तो त्यांचाच नव्हे तर,तो त्या पुरस्काराचा सन्मान असल्याचे नमूद केले. डॉ.बाबासाहेबाना घडवणारे कै.पेंडसे आणि कै.आंबेडकर हे शिक्षक होते.जात पात न पाहता विद्यार्थ्यांना घडवलं तर काय होत.ते हे उत्तम उदाहरणं असल्याचे नमूद केले.
यावेळी व्यासपीठावर हेमंत भागवत,संतोष बणगे,विद्याभारती चे कोकण प्रांत अध्यक्ष प्रदीप पराडकर,सचिन अणेरावं,चिपळूण नागरी पत संस्थेच्या सी.इ.ओ सौ स्वप्ना यादव,उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक मंदार ओक यांनी केले तर सूत्रसंचालन संगीता जोशी यांनी केले.











